मुंबई : राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला असून, पर्यटन क्षेत्रात अनेक संधी आहे. शिवकालीन गड-किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वास्तूंसह विविध धार्मिक शहारांमुळे पर्यटन क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तरुणांसाठी फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत इच्छूकांनी 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, पर्यटन पायाभूत सुविधा यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे.
जाणून घ्या आवश्यक पात्रता
वयोमर्यादा: या फेलोशिपसाठी 21 ते 26 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.
शिक्षण: कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक, तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
दर महिना 40 हजाराची फेलोशिप
निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा 35 हजार रुपये छात्रवृत्ती आणि 5 हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण 40 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.
अर्ज कुठे करायच?
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
संपुर्ण माहिती तपासा
अधिक माहितीसाठी www.mtdc.co या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.