जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घराजवळील महाराणा प्रताप चौकात आज सकाळ पासून सुरु बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसिबीच्या माध्यमातून पाडण्याचे काम सुरु आहे. दरम्यान यावेळी सादर बाधंकामची इमारत खचल्यामुळे संपूर्ण इमारतच जेसिबी मशीनवर पडल्याची घटना घडली. प्रकाराने अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. अनेक कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला तर जेसीबी मशीनवर इमारतीचा मलबा कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी, शेजारी असलेल्या इमारतींना मात्र धोका निर्माण झाला आहे. इमारतीचा संपूर्ण भाग तिरकस होऊन खाली कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ सुरु झाली.