मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृह संकुलात बनावट लसीकरण केल्या प्रकरणी संशयित आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी अखेर आज पोलिसांना शरण आले. या अगोदर त्याने अटकेच्या भीतीने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. दरम्यान अटकपूर्व जामिनाची मागणी करतांना या बनवत लसीकरणा मागे शिवम रुग्णालय असल्याचा आणि त्याच्या मालकाचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने. पोलीस रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करण्यात आला होता.
गेल्या आठवड्यात हा बनवत लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला. आता पर्यंत फारारी असणाऱ्या त्रिपाठी याने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. वकील आदिल खत्रीच्या माध्यमातून डॉ. त्रिपाठीने हा अर्ज केला होता. आपण पोलिसांना तपासात सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लसीकरण घोटाळा प्रकरणी कांदिवली हिरानंदानी हेरीटेज मध्ये नागरिकांना दिलेल्या बनवत प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या लसींचा बॅग चा वापर कोणत्या ठेकेदाराने केला यांची माहिती देण्याचे आदेश रुग्णालयांना पालिकेने दिले आहे.