राजमुद्रा वृत्तसेवा | हॉटेलमध्ये गेल्यावर एखाद्या वेटरने दिलेली सेवा पसंत पडल्यास त्याला टिप देऊन त्याचे कौतुक करण्याची पद्धत भारतामध्येही पाहिली जाते. अनेकवेळा छोट्या मोठ्या हॉटेलमध्येही अगदी ५ रुपयापासून टिप दिली जाते. मात्र अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील एका व्यक्तीने वेटरला १२ लाखांची टिप दिली. हे पाहून येथील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. या व्यक्तीचे खाण्याचे बिल फक्त २७०० रु झाले होत. मात्र त्याने मोठी टिप दिली.
लंडन डेरी परिसरातील स्टबल इन बार कम रेस्टोरंट मध्ये दुपारच्या सुमारास एक ग्राहक आला. त्याने काही खाद्य पदार्थ मागवले. यात दोन हॉट डॉग, वेफर्स, कोक, बियर आणि तकीला शॉट चा समावेश आहे. या व्यक्तीचे बिल ३७ डॉलर. भारतीय चलनानुसार २७४७ रुपये इतके झाले. बिल देण्याबरोबर या व्यक्तीने १६००० डॉलर ची टिप वेटर ला दिली. १६००० डॉलर आंतरराष्ट्रीय चलनाच्या दरानुसार भारतीय चलनात ११ लाख ८८ हजार रुपये होतात. यासंदर्भात बोलतांना बारचे मालक स्पाईक झारील्ला यांनी सर्व पैसे एकाच वेळी खर्च करू नका असा सल्ला या ग्राहकाने बार टेंडरला दिल्याचे सांगितले.