(राजमुद्रा, नाशिक) केंद्र सरकारच्या पी. एम. केअर फंड अंतर्गत नाशिक मध्ये साठ व्हेंटिलेटर आले असून गेल्या दहा दिवसांपासून हे व्हेंटिलेटर अक्षरशःधूळ खात पडले आहेत. व्हेंटिलेटर ची जोडणी करणारा कनेक्टर उपलब्ध नसल्यामुळे ही साठ व्हेंटिलेटर नाशिकच्या बिटको रुग्णालय, झाकीर हुसेन मनपा रुग्णालयांमध्ये पडून असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कोरोना ची परिस्थिती पाहता रुग्णांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या काळात जीवनावश्यक ठरणाऱ्या व्हेंटिलेटरचा फार मोठा तुटवडा भासत असताना हे आलेले साठ वेंटीलेटर धूळखात पडून असल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासन त्याचप्रमाणे राज्य सरकार कडून गेल्या दहा दिवसांपासून या गोष्टीकडे का दुर्लक्ष केले जात आहे? अशा परिस्थितीमुळे व्हेंटिलेटर अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.