धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील पाच कंदील चौकातील शंकर मार्केटला २८ जूनच्या पहाटे अचानक लागलेल्या आगीत ३५-४० दुकानं भस्मसात झाली. कोरोना लॉकडाऊन यात आधीच व्यवसाय नाही आणि अचानक लागलेल्या आगीट दुकाने खाक झाल्याने व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडला आहे. या घटनेत दुकानदारांचे दोन ते तीन कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करून मुख्य बाजारपेठ असलेल्या पाच कंदील येथील शंकर मार्केटला लागलेल्या आगीत कापड दुकानदारांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. फारुख शाह यांनी केली. यासंदर्भात आ. शाह यांनी मुंबई येथे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी सर्व परिस्थिती आणि कापड दुकानदारांचे झालेले नुकसान याबाबतची माहिती मंत्री महोदयांना दिली. दरम्यान ना. तनपुरे यांनी संबंधित विभागाला उचित कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे.