जळगाव: नुकताच मे महिना सुरु झाला असून यात उन्हाळ्याचे कडक उन तापू लागले आहे. याआधी दोन ते तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे या उन्हाळ्यात भर पडली आहे. शहरात गुरुवारी ४४.८ अंश सेल्सिअस अशी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली. यासह बुधवारी जळगाव शहर देशभरात सर्वात उष्ण ठरले असून, जगातील उष्ण शहरांमध्ये जळगाव शहर आठव्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे.
राजस्थानकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. जगात नायजर देशातील तीलबेरी येथे ४६.२ अंश सेल्सिअस एवढे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल म्यानमारमधील चौक, पाकिस्तानातील चौर व नवाब शाह, चाद देशातील नद जामेना, सेनेगलमधील मातम, नायजरमधील बिरनी एन्कानी यानंतर जळगावचे तापमान सर्वाधिक राहिले.
दुपारी बाहेर फिरणे टाळा
उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दुपारी बाहेर फिरणे टाळावे.