जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नविन बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. बसमध्ये चढत असताना महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागीने आणि पैशाची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहल सचिन तायडे (वय ३१, रा.सिडको, जि. छ. संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या नवीन बस स्थानक येथे यावल बसमध्ये बसण्यासाठी चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने बॅगमधून १ लाख १२ हजार रुपये मुद्देमाल असलेले सोन्याचे दागिने, टोंगल, मणिमंगळसूत्र चोरून नेले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहेत. दरम्यान, बसस्थानकात चोऱ्या नित्याच्याच झाल्या असून पोलिसांनी यावर अंकुश ठेवावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.