मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलून गेली आहे. सत्ता गेल्यानंतर भाजपमधे सुद्धा अनेक बदल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडे अजूनही भाजपा मधेच आहेत का ? अशी म्हणण्याची वेळ आहे कारण सत्तेत असतांना सोशल मिडीयावर सक्रीय असणारे तावडे आउट ऑफ दिसत आहे.
राज्यात सत्ता असतांना भाजपमध्ये सक्रीय असणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे विनोद तावडे यांना समजले जायचे परंतु विधानसभा निवडणुकीत तावडेंच्या जागी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले व नंतर विधान परिषदेवर सुद्धा संधी देण्यात आली नाही. त्यामुळे तावडे नाराज असल्याचे राजकारणात बोलले जात आहे. जम्मू काश्मीरमधील ड्रोन हल्ल्यावरून शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा तर नाराजी दूर करण्यासाठी विनोद तावडे यांचे हरियाणा राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. परंतु तावडे सध्या पक्षापासून दुरावले असल्याचे दिसून येत आहे. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा हवा तसा सहभाग दिसत नाही. विशेष म्हणजे राज्यभरात ओबीसी आरक्षणावरून भाजपकडून राज्यसरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात असतांना तावडे मात्र गायब असल्याचे दिसून आले आहे. ट्विटर वर फॉलोवर्स असलेले तावडेंचे अकाउंट सुद्धा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे तावडे नेमके आहे तरी कुठे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसून आली.