जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. शाळेची ही १३ वी बॅच असून शाळेन सुरवातीपासून १०० टक्के निकालाची या वर्षी ही परंपरा राखली आहे. ह्या वर्षी शालेय स्तरावर कु. शताक्षी उमेश वाणी हीने ९७.८ टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला पटकावला.
द्वितीय क्रमांक चि कुणाल ज्ञानेश्वर पाटील ह्याने ९६.२ टक्के मिळवले. तृतीय क्रमांक श्रीमन परेश झवर ९६ टक्के मिळवले . चतुर्थ क्रमांक कु मानसी निलेश सुलक्षणे हीने ९५. .टक्के मिळवले. पाचव्या क्रमांकावर कु सुनिधी नितीन मेने हीने ९५ टक्के मिळविले. एकूण १०९ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेला बसले होते. त्यामध्ये १८ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात’ हिंदी व संस्कृत विषयात ४१ विद्यार्थी, गणितात ३६ विद्यार्थी व सामाजिक शास्त्रात एकूण १७ विद्यार्थिनी ९० पेक्षा जास्त गुण मिळवत यश संपादित केले.तसेच शताक्षी वाणी व श्रीमान झवर यांना संस्कृत विषयात मध्ये तर कुणाल पाटील यास गणितामध्ये 100 गुण मिळाले आहेत .सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील तसेच सर्व व्यवस्थापन मंडळ श्री राजेंद्रजी नन्नवरे, डॉ. रत्नाकर गोरे, श्री. धनंजय जकातदार, श्री विनोद पाटील, सौ. हेमाताई अमळकर शाळेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.