मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यासह सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले असतांना. गेल्या वर्षापासून शाळा ऑनलाईन सुरुयेत. पण १० वि आणि १२ वीची बोर्डाची परीक्षा मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही रद्द करण्यात आली होती. व विद्यार्थ्यांचा मूल्यांकनाच्या आधारावर निकाल लागणार होता. आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा १० वी आणि १२ वी चा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल ९ वी आणि १० वीच्या घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थ्याने आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितलंय.
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल २०२१ निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार, यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील.तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
निकाल बघण्यासाठी
- सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
- होम पेजवरील SSC परीक्षा निकाल २०२१ लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पेज स्क्रीनवर दिसेल.
- आपल्या रोल नंबरसह मागितलेली अन्य माहिती येथे भरा.
- सबमिट वर क्लिक करा.
- आता SSC निकाल २०२१ आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.