जळगाव: राज्याचे लोकनेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात शिंदे गट शिवसेना महानगरतर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गिरिष ठाकूर व जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक तथा ना.गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख व शिवसेना महानगरप्रमुख कुंदन काळे यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. प्रसंगी शहर संघटक नगरसेवक ऍड दिलीप पोकळे, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक आशुतोष पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सरिता माळी कोल्हे, भुषण भोळे, अजय देशमुख व इतर पदाधिकारी सहभागी होते.