मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. त्यांची भवानी तलवार ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जगदंबा तलवारीचाही शोध लागला आहे. ही तलवार आणि वाघ नखे लंडनमध्ये आहे. ही तलवार 2024 च्या आधी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं होतं. यासाठी महाराष्ट्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.
शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकार एक आराखडा तयार करण्यात आला आहे. ब्रिटन सरकारजवळ या संदर्भात अंतिम टप्प्यात बोलणे सुरु आहे. त्याठिकाणी यासंदर्भात एमओयुवर सह्या करण्यात येणार आहे. वाघनखे आणि जगदंबा तलवार भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटीश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद होता.
सहमती पत्रावर हस्ताक्षर करण्यास तयारी
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढील महिन्यात जगदंबा तलवार आणि वाघ नखे आणण्यासाठी ब्रिटन दौरा करणार आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जगदंबा तलवार आणि वाघ नखे आणण्यासंदर्भात माझी ब्रिटनचे उपउच्चायुक्त कॅम्मेल यांच्यांशी चर्चा झाली होती. त्यांनी यासंदर्भात सहमती पत्रावर (एमओयु) हस्ताक्षर करण्यास तयारी दर्शवली.
ब्रिटनमध्ये कुठे आहे तलवार
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगदंबा तलवार सध्या ब्रिटनमधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये आहे. लंडनच्या रॉयल कलेक्शनमध्ये असणारी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून तिचे पूर्वापार चालत असलेले नाव जगदंबा असल्याचंही स्पष्ट झालं आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खान याला मारण्यासाठी वापरलेली वाघ नखेही ब्रिटनमध्ये आहेत.