(राजमुद्रा, मुंबई) जळगाव येथील ग स सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जाहीर करण्यात आलेला 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी कोरोनाच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्त करण्यात आलं. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते याचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, संचालक तुकाराम बोरोले, विलास नेरकर, एन एस पाटील आदींनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे हा निधी सुपूर्त केला होता. हा मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला असून कोरोनाविषाणूच्या विरोधात लढा देण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसेना प्रमुख वक्ते खासदार संजय राऊत खासदार अरविंद सावंत परिवहन मंत्री अनिल परब आदी मान्यवर उपस्थित होते.