जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पालिकेच्या राजकीय आखाड्यात घडामोडींना गती आली असून मनपा सत्तांतर झाल्यानंतर बंडखोर नगरसेवकांकडून भाजपाला राजकीय धक्का देण्याची रणनीती आखली जात आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपचे गटनेते भगत बालाणी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय झाला असून भाजपाच्या बंडखोरांनी वकील दिलीप पोकळे यांचे गटनेतेपदी नाव निश्चित केले असल्याचे समजते. तसेच उपगटतेपदी चेतन संत आणि प्रतोदपदी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे नावे शिक्कामोर्तब केले असल्याचे सूत्रांकडून समजते. येत्या महासभेत महापौर व आयुक्तांना गटनेता व उपगटनेता बदलाचे पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे भाजपाचे गटनेते भगत बालाणी आणि उपगटनेता राजेंद्र घुगे पाटील यांना सभागृहातच पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे.