जळगाव वृत्तसेवा | शहरात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची समस्या भेडसावत आहे जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघातांच्या समस्या निर्माण झाला लोकप्रतिनिधींमध्ये आमदार, नगरसेवक यांच्याकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले अनेक भागात तर नगरसेवकच फिरकत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या, मात्र निगरगट्ट असलेल्या महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. काही प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू झाली मात्र यापूर्वी नागरीकांना लोकप्रतिनिधींच्या दिरंगाई कारभारामुळे नागरिकांचा उद्रेक होत आहे. मात्र याचे पडसाद जनेते मधुन उमटायला सुरुवात झाली आहे. त्याचा फटका भाजप आमदार सुरेश भोळे ( राजू मामा) यांना बसला आहे.
नागरिकांना मिळणाऱ्या सुख सुविधांवरून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर शहरात आहे. मात्र याचा फटका भाजप आमदार राजू मामा भोळे यांना बसला आहे. असं हे झालेल्या नागरिकांनी असेल वार्ड क्रमांक 16 मध्ये आमदार भोळे यांना घेतले आणि होत्याचं नव्हतं झालं. दिलेली आश्वासने लोकप्रतिनिधींनी पाळलेली नाही तुम्ही मत मागण्यासाठी आमच्या दारात आलात आम्ही मतदान देखील केले मात्र दिलेली आश्वासनाकडे तूम्ही दुर्लक्ष केले असा थेट जाब शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे यांना विचारण्यात आला आहे.
आमदारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे आमदार भोळे हे चांगलेच धारेवर धरल्याने व्यवस्थित झालेले देखील दिसून आले आहे. नागरिक जाब विचारत असताना प्रत्यक्ष आमदार व स्थानीक नगरसेवकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे शिंदे गट व भाजपची राज्यात युती असल्याने शिंदे गटांच्या कार्यक्रमांत आमदार सुरेश भोळे यांना स्थानिक आमदार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, मात्र आमदार महोदय उपस्थीत होताच स्थानिक नागरिकांच्या तळ पायातील आग मस्तकात गेली, आमदारांना थेट घेराव घालून गेल्या पाच वर्षात मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा जाब विचारण्यात आला. महापालिका निवडणूक व विधानसभा निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता झालीच नाही याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही प्रमाणात मिळालेल्या निधीवरून मनपामध्ये वादंग निर्माण झाले होते यातील काही कामे सध्या सुरू आहेत.
महापालिका निवडणुकीत निवडणुकीचा प्रचार करत असताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावला एका वर्षात सिंगापूर करू असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात जळगाव साकारण्यातच भाजपला अपयश आले, गेली ३५ वर्ष सत्तेचे सूत्र काढून जळगावकरांनी भाजपाच्या आती महापालिकेचे सत्ता केंद्र दिले, भाजपकडून महापालिका निवडणुका आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या होत्या, जळगाव शहराचा विकास न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश भोळे यांना मतदान मागणार नाही, असे विधान देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. मात्र तरी देखील जळगावकरांनी आमदार भोळे यांना विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केले, सत्ता केंद्रे देऊन महापालिकेत ५ वर्ष पुर्ण होत आहे, भरभरून मतदान करून देखिल अपेक्षा फोल ठरल्या, आमदार नगरसेवकांनी न केलेली आश्वासनांची पूर्तता सुसंस्कृत असणाऱ्या भाजपला डॅमेज करणारा आहे.
नियोजनात तरबेज असणाऱ्या भाजपाला जळगाव शहराच्या विकास कार्यात अपयश येणे दुर्दैवी आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आल्या ने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते, मात्र शहराची झालेली अवस्था पाहता व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला आहे.