जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून नावाजलेले जिल्ह्यातील माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना व राष्ट्रवादी कडून केला जात असल्याचे दिसून आले आहे. आ. महाजन यांच्यावर अनेक प्रकरणात विरोधकांनी गंभीर आरोप करून त्यांची राजकीय गोची करण्याचा प्रयत्न केला. परंतु सध्या शांत असलेले आ. गिरीश महाजन लवकरच मोठा राजकीय भूकंप करण्याची शक्यता आहे.
आ. महाजन यांच्यावर जिल्ह्यातील जि.प मालकीच्या जागेवर बीओटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या कामात मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी वकील विजय पाटील यांनी केला होता. त्याचे राजकीय पडसाद उमटत नाही तोच बीएचआर प्रकरणात त्यांचे जवळचे समर्थक अडकल्याने याप्रकरणी त्यांनी अद्याप मौन वरात धारण केले आहे. तसेच काही दिवसांपासून आ. महाजन यांच्यावर आरोपांच्या फेऱ्या सुरु असून त्यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.
एवढेच नव्हे तर आ. महाजन यांच्यावर जळगाव महापलिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवाजी नगरच्या उड्डाणपुलासंदर्भात सुरु असलेल्या कामाबाबत उपोषणास बसलेल्या व्यक्तीस भेट देऊन त्याच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुलाबाबत संथगतीने सुरु असलेल्या कामावरून आरोपांची तोफ डागली. नगरसेवकांना दिल्याजाणाऱ्या टक्केवारी वरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. बिएचआर प्रकरण, पालिकेतील सत्तांतरण, ओबीसी आरक्षण आदी विषयांवरून आ. गिरीश महाजन यांना कैचीत पकडण्याचा विरोधकांचा हा राजकीय डाव वेळीच हाणून पडणार असल्याचे दिसून आले आहे. कारण लवकरच जिल्ह्यातील राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दात शक्यता आहे.