धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मध्यमवर्ती भागात असलेल्या कारागृहात दि 11 रोजी पश्चिम देवपूर पोलिसात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होता. अर्जुन रंगनाथ आव्हाड हा आरोपीला कारागृहातून दवाखान्यात व्हॅक्सिन घेण्यासाठी नेले असता त्याने आज चार वाजेच्या सुमारास जेल मधील एका रूम वर चढून उडी घेत फरार झाला. सदर आरोपीचा शोध जेलर व पोलिस घेत असताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या पथकाने एक तासाच्या आत आरोपीचा पाठलाग करून साईबाबा नगर पश्चिम देवपूर हद्दीतून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, निलेश पोतदार, गुणवंत पाटील व किरण भदाणे यांनी केली.