यावल : यावल तालुक्यात एका लग्न समारंभात वाद झाला होता. यावेळी एकास चाकूच्या साहाय्याने गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यावर यावल कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यावल मध्ये एका लग्न समारंभात 20 एप्रिल 2017 रोजी झालेल्या घटनातील आरोपी ज्ञानेश्वर मस्के (रा. बोदवड) व विजय केवट (रा. बोदवड) यांनी फिर्यादीस चाकुच्या साह्याने गंभीर दुखापत केली असा भादवी कलम 326, 504, 506 आणि 34 असे कलम लावून आरोप होता. परंतु सदरील खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. तरी आरोपींविरुद्ध सबळ पुरावा नसल्या कारणामुळे आरोपी 23 मे 2023 रोजी यावल येथील मे.प्रथम वर्ग न्यायाधीश कोर्ट यांनी आरोपी ज्ञानेश्वर मस्के व विजय केवट यांना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश पारित करण्यात आला. आरोपी विजय केवट यांच्यातर्फे एडवोकेट विकास शर्मा बोदवड यांनी काम पाहिले. आरोपी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्यातर्फे एडवोकेट महेश भोकरीकर व एडवोकेट अनिल मोरे, भुसावळ यांनी काम पाहिले.