मुंबई : देशात कुठलिही शासकीय योजना असो किंवा कोणतेही काम आता आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आधार कार्डशिवाय महत्त्वाच्या कामाला अडकून राहावं लागू शकतं. तसेच तुमच्या आधार कार्डच्या मदतीने कोणीही गैरवापरही करु शकतात. पण आता तुमचं आधार कार्ड हरवलं तर तुम्ही घरबसल्या तुमचं आधार कार्ड डाऊनलोड करु शकता, ते कसं हे आज जाणून घेऊ…
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. यात नाव, पत्ता आणि इतर माहितीसह बॉयोमेट्रिक माहिती देखील असते. पण जर आपलं Aadhaar Card हरवले असेल आणि आपला मोबाईल नंबर देखील त्याशी जुळलेला नसेल किंवा नंबर बदलून गेला असेल तर uidai च्या वेबसाइटवर ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ सेवेचा लाभ उचलू शकता. आधार रीप्रिंट करण्यासाठी आपल्याला 50 रुपये चार्ज करावे लागतील.
स्टेप 1 : UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://ssup.uidai.gov.in/web/guest/ssup-home ला भेट द्या आणि टॅबमधील “रिट्रीव लॉस्ट किंवा फरगॉटन युआयईडी/ईआयडी” पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 2 : मग योग्य ऑप्शन (आधार नंबर किंवा एनरोलमेंट नंबर) यावर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, रजिस्टर्ड ईमेल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर टाका.
स्टेप 4: त्यानंतर स्क्रीनवरील सिक्योरिटी कोड टाका आणि गेट वन टाईम पासवर्ड बटनावर क्लिक करा.
स्टेप 5: मग रजिस्टर्ड ईमेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन ओटीपी मिळवा आणि तिथे टाका.
स्टेप 6 : ओटीपी वेरिफाय होताच तुम्ही रजिस्टर्ड ईमेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुमचा आधार नंबर किंवा एनरोलमेंट नंबर मिळवाल.
स्टेप 7: मग UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर जाऊन डाऊनलोड आधार या बटनावर क्लिक करा.
स्टेप 8: मग तिथे अपना आधार नंबरवर एनरोलमेंट नंबर, नाव, पिन कोड, कॅप्चा कोड टाका.
स्टेप 9: त्यात गेट वन टाईम पासवर्ड बटनावर क्लिक करुन रजिस्टर्ड ईमेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी मिळवा.
स्टेप 10: ओटीपी वेरिफाय होताच तुम्ही आधार कार्डची कॉपी डाऊनलोड करु शकता.