जळगाव राजमुद्रा | जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे कामे होत नसल्याची बोंब उठत असताना जळगाव शहरात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालय असलेल्या ठिकाणी जी. एम फाउंडेशन येथे जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. हा वाद इतका तीव्र होता की यामध्ये थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच मध्यस्थी करावी लागली आहे आयुक्त गायकवाड यांनी तर जमिनीवरच ठिय्या मांडून नगरसेवकांच्या शाब्दिक चकमकीत सडेतोड उत्तर दिल्याची देखील चर्चा आहे.
इतर नगरसेवक असलेल्या शिंदे गटासह शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात कामांना मोठ्या प्रमाणात मंजूरी दिले जातात मात्र आमच्या फाईल्स वर सह्या केल्या जात नाही याला सर्वत्र दोषी आयुक्त विद्या गायकवाड असल्याचा टपका भाजप नगरसेवकांकडून ठेवण्यात आला आहे. या सर्व व्यथा भाजप नगरसेवकांनी ग्रामविकास मंत्री जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्यापुढे मांडले आहेत.
यावेळी आयुक्त विद्या गायकवाड यांना जी. एम फाउंडेशन येथे बोलउन घेण्यात आले होते, मंत्री महाजन स्वतः त्यांच्या खुर्चीवर बसलेले असताना त्यांच्यासमोरच नगरसेवक आणि आयुक्तांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. आम्ही कधीही बंडखोरी केली नाही, पैशांसाठी इतर पक्षांमध्ये गेलो नाही मात्र तरी देखील आमची विकास कामांसाठी अनेक वेळा अहवेलना केली जात आहे.
केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता मात्र तरी देखील आमची कामे साध्या महापालिकेत होत नाही, निवडणुकांना सामोरे जात असताना आम्ही नागरिकांना काय तोंड द्यावे, असा सवाल देखील मंत्री महाजन यांच्यापुढे उपस्थित करण्यात आला आहे. जळगाव शहरात खड्ड्यांची समस्या बिकट आहे. शहराचे अद्याप पर्यंत कायापालट झालेला नाही, निवडणुकांना सामोरे जाताना नागरिकांना नेमकं काय उत्तर द्यावं ? हा प्रश्न आमच्यापुढे आहे. असे अनेक सवाल जवाब मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे करण्यात आले आहे.
मात्र मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी देखील शहरासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केला आहे असं ठामपणे नगरसेवकांना सांगितले आहे, या शंभर कोटीच्या निधीमधून शहरातील मुख्य रस्ते कॉंक्रिटीकरण केले जातील. आणि लवकरच जळगाव शहरात मुख्यतः विकास कामे सुरू होतील असा आश्वासन दिले आहे.
मात्र यासाठी नियोजन करावे लागेल नियोजन असल्यास अनेक डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा त्याच ठिकाणी काँक्रिटीकरण केल्यास जनतेतून अधिक रोष वाढणार आहे. यामुळे निधी देखील वाया जाण्याची शक्यता आहे. नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. अवघ्या महिनाभरावर जळगाव महापालिकेत प्रशासक बसणार आहे. अशा परिस्थितीत कामे नेमकी कशी करावी ? अशा बुचकळ्यात भाजप नगरसेवकांची कोंडी निर्माण झाली आहे. मात्र या सर्व वादावर पडदा टाकत आयुक्त विद्या गायकवाड यांना मंत्री गिरीश महाजन यांनी सूचना दिली आहे भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे मार्गी लागावी यासाठी प्रशासकीय मंजूर देण्यात यावे अशा सूचना देण्यात आले आहे.