जळगाव राजमुद्रा | जळगाव शहरातील पिंपराळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण दि.१० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे या पुतळ्याचे उद्घाटन उबाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर महापालिकेतील लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचेही उद्घाटन उद्धव ठाकरे हेच करणार आहेत, मात्र राज शिष्टाचारच कारण देत नगरसेवक तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या पुतळा उद्घाटन कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.
उबाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्घाटन करण्याचा काही एक संबंध नाही, राज शिष्टाचारानुसार या दोन्ही पुतळ्यांचे उद्घाटन करण्यात यावे. सरकारी निधीतून काम झालेले आहे. तरीदेखील कोणत्याही शासकीय पदावर नसताना उद्धव ठाकरे यांचा हातून छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उद्घाटना च्या कार्यक्रमास विरोध दर्शवण्यात आला आहे.
यासाठी जळगावतून विरोधाचे पत्र देखील मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त आहे आणि त्याच पत्राच्या आधारे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नियोजित दौरा आयोजित करण्यात येईल. सदर कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे असे पत्र काढण्यात आले आहे. यासोबतच पुतळा अनावरणाचा कार्यक्रमाला स्थगिती देण्याचे पत्र शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे. यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.
पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा संपूर्ण खर्च हा महापालिकेच्या स्वतंत्र निधीतून करण्यात आला आहे. यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी विशेष पाठपुरावा केल्याचे देखील सांगितले जाते. मात्र भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेसोबत जाऊन बंडखोरी, भाजपकडून यापूर्वीच उपमहापौर असलेल्या कुलभूषण पाटील यांना मोठ्या प्रमाणात विरोध , त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे जाणारे श्रेय अशी अनेक कारणे उपस्थित केली जात आहे. उद्घाटन कार्यक्रमात राज शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तीच परिस्थिती महापालिका आवारातील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबत निर्माण झाली आहे. यामुळे महापुरुषांच्या पुतळ्यावरून जळगाव शहरात मोठे राजकीय गमासान निर्माण झाले आहे, त्याचे देखील उद्घाटन उबाटा पक्षाचे पक्षप्रमुख. उद्धव ठाकरे यांच्या हातून करण्यात येणार होते. मात्र या सर्व बाबींवर जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी सामोरे जात पुतळ्याचे उद्घाटन कोणत्याही परिस्थितीत होईल याला कोणीही अडचणी निर्माण केल्याचा प्रयत्न केला तरी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होईल असे देखील ठणकावून सांगितले आहे.
पुतळा उद्घाटन कार्यक्रमाच्या मुळे शिंदे गट आणि भाजप उबाटा या पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे आपापल्या गटाची ताकद दाखवण्यासाठी तिघी पक्षांकडून जोरदार ताकत लावली जात आहे. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पुतळ्यांचे लोकार्पण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. एका पदाधिकाऱ्यांनी तर राज्यात आपली सत्ता असताना सुद्धा आपल्याला कोणत्याही विषयात विश्वासात घेण्यात आले नाही, मग मात्र शासकीय निधीतील पुतळ्यांचे लोकार्पण असताना सत्ताधारी पदाधिकारी कार्यकर्त्यांना धावण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यासोबतच भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात नेमकं काय होतं हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. शासनाची स्थगिती जरी असली तरी उबाटा पक्षाचे पदाधिकारी यांनी कोणत्याही परिस्थितीत पुतळ्यांचे अनावरण होणार असे ठामपणे सांगितले आहे. पूर्व नियोजित कार्यक्रम असताना कार्यक्रमाला शासनाचा स्थगिती देण्याचा काही एक संबंध येत नाही. मात्र किती विरोध असला तरी आम्ही कार्यक्रम करणार असे सांगण्यात आले आहे.