जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव पोलीस स्टेशन ला अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र आरोपी हा शिक्षा सुनावल्या पासून फरार झाला होता. दरम्यान आरोपी चाळीसगावात हिरापूर रोड येथे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार आरोपी बंडू रमेश देशमुख राहणार रामवाडी ता. चाळीसगाव याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी बंडू रमेश देशमुख याच्या विरुद्ध १९९८ ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला औरंगाबाद खंडपीठाने १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. आरोपीने सुप्रीम कोर्टातही केस दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला होता. निकाल दिल्यापासून आरोपी बदू देशमुख हा फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सुधाकर लहारे, अशोक पाटील, रामकृष्ण पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, भरत पाटील, वसंत लिंगायत यांनी आरोपीला पुणे, नांदगाव, मुंबई आदी ठिकाणी शोध घेतला होता मात्र आरोपी हा चाळीसगाव जवळ हिरापूर ला आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने सपळा रचून त्यास ताब्यात घेतले. जळगावच्या सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता. त्याला पुढील शिक्षेसाठी कारागृहात पाठवण्यात आले आहे.