मुक्ताईनगर : गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे यासोबतच जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या दिग्गज नेत्यांच्या सभा यावरून जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढळून निघालेले आहे. रावेर लोकसभेची निवडणूक ही एकनाथराव खडसे यांनी लढावी अशी आगरी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावच्या जाहीर सभेत मांडली होती. त्यावरून रावेर लोकसभा आमदार एकनाथराव खडसे लढवतील अशी जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्याचे राजकीय वर्तुळात रंगत आहे मात्र याबाबत एकनाथराव खडसे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
1997 ते 1998 या काळात दरम्यान तेरा महिन्यासाठी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते तो अपवाद वगळता अद्याप पर्यंत रावेर लोकसभा भाजपाच्या ताब्यात राहिली आहे. रावेर लोकसभा कायम भरत आलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीत तसेच वरिष्ठ नेत्यांमध्ये या जागे बाबत काय निर्णय होतो ? त्या नुसार रावेर लोकसभेचे चित्र अवलंबून असणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिले आहे.
रावेर लोकसभा या मतदारसंघात एकूण नऊ वेळा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला आहे मात्र अद्याप पर्यंत काँग्रेसकडून याबाबत पाहिजे ते ठोस उचलण्यात आलेले नाही, मात्र आता इंडिया आघाडी झाल्याने चित्र बदलण्याची शक्यता आहे. असल्याचे भाकीत एकनाथराव खडसे यांनी वर्तवले आहे. काँग्रेसने जर जागा सोडली नाही तर दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ तसेच राष्ट्रवादीला जर जागा सोडले तर मी स्वतः पक्षाने आदेश दिल्यास उमेदवारी करेल असं वक्तव्य देखील आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
लोकसभा लढवण्यासाठी मी पाहिजे तेवढा अनुकूल नाही मात्र पक्षाला उमेदवार मिळाला नाही तर मला स्वतः उमेदवारी करावी लागेल माझ्यासारखा कार्यक्षम उमेदवार लढण्याची राष्ट्रवादीला यश मिळेल असे देखील खडसे बोलले आहे.
खुद्द एकनाथराव खडसे यांनी जर रावेर लोकसभा निवडणूक लढवली तर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपला देखील उमेदवाराला अधिक बळ देण्याची गरज आहे. भाजपकडून प्रत्येक लोकसभेची चाचणी केली जात आहे या दरम्यान ज्या लोकसभा अधिक अडचणीच्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजपने काम सुरू केले आहे. यासाठी भाजपने टीम तयार केल्या असून मोठ्या प्रमाणावर रणनीती आखल्या जात आहे.