प्रतिनिधी फैजपूर- सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांना प्रहार जनशक्ती पक्ष व अनिल चौधरी यांनी निवेदन देऊन विद्यार्थ्यांनीला न्याय मिळावा म्हणुन मागणी केली. रोज झालेला हा विद्यार्थी होता राजकीय दबावाला बळी पडून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाला होता. चार चाकी ची जोरदार धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत जोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि; काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये बळजबरीने दबाव आणून डी. एन कॉलेजचा विद्यार्थी असलेला भुवनेश डालोराम तेजारा (वय 20) रा. भोकरी ता. रावेर याला सहभागी होण्यासाठी भाग पाडले असता काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू असताना जलसंवाद यात्रेतीलच एका चार चाकी वाहनाची धडक लागल्याने भुवनेश जोरदार जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागल्याने उपचारादरम्यान दवाखान्यात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भुवनेश्वर डी. एन कॉलेजमध्ये बीएससी चे शिक्षण घेत होता तो दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी डी. एन कॉलेज मधील प्राध्यापक शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यावर दबाव आणला होता, या सोबतच इतर विद्यार्थ्यांना देखील जनसंवाद यात्रेत सहभागी करून घे अशा देखील सूचना त्याला देण्यात आल्या होत्या, याबाबत त्याला कॉलेजमधील प्राध्यापकांचे फोन तसेच काँग्रेसने त्यांचे कॉल्स केल्याचे समजते आहे. मात्र शैक्षणिक आयुष्याचा नुकसान नको म्हणून भुवनेश याने दबावात येऊन अखेर काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाला.
मात्र काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान एका राजकीय नेत्याच्या वाहनाची धडक लागल्याने भुवनेश चा मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांना वेठीस धरून राजकीय विविध कार्यक्रमांमध्ये दबाव आणून उपस्थित राहण्याबाबत सांगितले जाते. याच दबावाला बळी पडून भुवनेश् काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाला आहे. यादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मात्र वाहन चालक एका राजकीय नेत्याचा असल्याने हे प्रकरण दडपण्याचा कटकारस्थान आखले जात आहे. माध्यमात तसेच न्यूज चॅनल वर चुकीची माहिती देऊन याबाबत वृत्त छापून आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे अपघात हा दुचाकीने झाला असे बिंबवण्यात आल्याचे समजते आहे. शवविच्छेदन हे भुवनेशचे कुठलेही नातेवाईक आठवण आई – वडील घटनास्थळी अथवा दवाखान्यात पोहोचले नसताना करण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात मोठा राजकीय दबाव आणून चुकीच्या पद्धतीने पोलिसात दुचाकीचा अपघात झाला म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच आहे सदर प्रकरणाचा योग्य तो तपास करून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून पीडित विद्यार्थ्याला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती.
या वेळी प्रहार शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंदू पाटील, यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष पिंटू धांडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वसीम शेख, राकेश भंगाळे व सर्व प्रहार पदाधिकारी उपस्थित होते