जळगाव राजमुद्रा (कमलेश देवरे) | जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना अनेक राजकीय नेते जळगाव जिल्ह्यात राजकीय दौरे तसेच सभांचे आयोजन करीत आहे. सागर पार्क येथे झालेली राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची सभा यासोबतच नुकताच झालेला उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यामुळे जळगाव जिल्ह्याला राजकीय अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच इतर कार्यक्रमांसोबतच जळगाव शहरातील पुतळे अनावरणाचा कार्यक्रम अधिक चर्चेत ठरला कारण यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात राज शिष्टाचारावरून वाद पेटल्याचे पाहायला मिळाले.
महापुरुषांच्या कार्यक्रमाबाबत कुठलाही राजकारण होऊ नये अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर शिंदे गटाला अखेर आपली तलवार म्यान करावी लागली आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात येईल ही भूमिका शिंदे गट तसेच भाजपाची होती. महापौर उपमहापौरानी कार्यक्रमाबाबत कुठेही विश्वासात घेतल्या नाही असा थेट आरोप देखील यादरम्यान करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाची सरशी झाल्याचे पाहायला मिळाले.
कुलभूषण पाटील हे मूळचे शिवसैनिक, जळगाव महानगरचं पद असतानाच त्यांनी ऐन वेळेस भाजपमध्ये जात जळगाव महापालिका निवडणूक लढवली मात्र त्याच भाजपला महापौर निवडणुकीमध्ये सत्य बाहेर खेचण्यात त्यांचा वाटा आहे. बहुमत नसताना शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर कुलभूषण पाटील यांची वरिष्ठ नेत्यांकडे अधिक वजन वाढले यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनासह उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांनी खुद्द उपस्थिती लावली.
जळगाव महापालिकेतील महापौर जयश्री महाजन यांच्या प्रयत्नांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तसेच पिंप्राळा येथील उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच्या उद्घाटना संबंधी मोठ्या प्रमाणात वाद पेटले होते. शासनाकडून त्या कार्यक्रमावर स्थगिती देखील आणण्यात आली मात्र शासनाची स्थगिती ही कागदावरच राहिली प्रत्यक्षात मात्र कुठलाही प्रभाव शासनाच्या त्या परिपत्रकाचा दिसून आलेला नाही. कारण यामध्ये संपूर्ण डावपेच तसेच सामाजिक डावपेच खेळत ठाकरे गटाने अखेर ठरलेला कार्यक्रम घेतला आहे. महापालिकेत बहुमत नसताना राज्यात सत्ता नसताना जळगाव मध्ये ठाकरे गटाकडून दाखवण्यात आलेली ताकद सत्ताधाऱ्यांना चांगले जिव्हारी लागली आहे.
एकंदरीत सत्ताधारी गटाची जळगाव मध्ये कोंडी झाल्याची दिसून आले. अधिक विरोध केला तर सामाजिक उद्रेक देखील होऊ शकतो कारण राज्यात मराठा आंदोलन अधिक तीव्र आहे. आणि या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास विरोध म्हणजे जनतेचा रोष ओढवून घेणे, प्रकरण अंगाशी यायला नको म्हणून सावध पवित्रा घेत अनेकांनी या प्रकरणात अवघ्या बारा तासापूर्वी समन्वयाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
ठाकरेंच्या शिलेदार असणारे महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपली ताकद अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे दाखवून दिली सर्वत्र ठाकरे गटाला राज्य सरकारकडून कोंडी होत असताना जळगावात मात्र ठाकरे गटातील महापौर, उपमहापौर अपवाद ठरले आहे.
महापौर जयश्री महाजन या गेल्या अनेक वर्षापासून जळगाव महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे त्या मूळ शिक्षिका आहेत. महापौर पदाचा सर्वाधिक काळ त्यांनी उपभोगला, त्यांच्या कार्यकाळात शहरात भाजपाचा काळात मंजूर झालेल्या निधीचे काम थोडक्यात रस्त्यांची काम मार्गी लागली. यशस्वीरित्या अडीच वर्षे महापौर पद त्यांनी उपभोगले येणाऱ्या 17 सप्टेंबर पर्यंत त्यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. महिला म्हणून महापौर पदाच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जमेच्या बाजू ठरणाऱ्या आहेत.
भाजपचे दिग्गज नेते तसेच शिंदे गटाचे दिग्गज नेते जळगाव जिल्ह्यात असताना मात्र ठाकरे गटाची महापुरुषांच्या कार्यक्रमात झालेली सरशी उद्धव ठाकरे यांना चांगलीच भावली एवढेच नाही तर उद्धव ठाकरे समोर महापौर जयश्री महाजन यांनी केलेले भाषण त्याचे तोंड भरून कौतुक पक्षप्रमुखांनी केलेच आगामी काळात महापौर, उपमहापौर हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते असतील हे मात्र निश्चित आहे. महापौर, उपमहापौरानं बद्दल उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये वेळोवेळी केलेला उल्लेख, आगामी काळात भाजप विरुद्ध संघर्षाला हे दोन्ही शिलेदार सामोरे जाणार याचे संकेत दिले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या नसल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महापौर जयश्री महाजन तसेच कुलभूषण पाटील हे विधानसभेच्या स्पर्धेत असतील असे देखील संकेत दिलेले आहे. यासाठीच यापूर्वीच महापौरांचे पती असलेले महापालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी आपला मोर्चा जळगाव ग्रामीणकडे वळवला आहे यासाठी ते ठिकाणी भेटीगाठी देखील देत आहे अनेक मान्यवरांच्या ते जळगाव ग्रामीण मतदारसंघात जाऊन भेट घेत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून सुनील महाजन यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले यासोबतच त्यांनी उभे केलेले पॅनल देखील प्रचंड बहुमतांनी विजयी झाले.
राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदे तसेच भाजप च्या पॅनलला पराभूत केल्यानंतर महाजन यांचा आत्मविश्वास जळगाव ग्रामीणकडे वाटचाल करणारा ठरला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेतृत्व करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते जळगाव ग्रामीण मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री पद असतांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुनील महाजन यांच्याकडून मिळालेला शह आगामी राजकारणाची नांदी रोवणारा ठरतो की काय ? याकडे आता लक्ष लागून आहे.
जळगावच्या दौऱ्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधाला जुगारत करण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याचे उद्घाटन हे सगळं प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर महापौर उपमहापौरांनी लढवलेली खिंड याचे खाजगी मध्ये कौतुक करताना आगामी काळात आणखी एकदा सामोरे जाण्याची तयारी करा असे देखील ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. नेमकं जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना नेतृत्व करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघांमधून देतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मातोश्री मधून होणार हे मात्र निश्चित आहे.