पुणे : रावेर लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे जरी निवडणूक लढले तरी विद्यमान खासदार असलेल्या रक्षा खडसे या दोन लाख मतांनी निवडून येतील असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे खा रक्षा खडसे गेल्या दोन टंपासून रावेर लोकसभेचे नेतृत्व करीत आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आमच्या सगळ्याच खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी केली जाऊ नादी खा रक्षा खडसे यांनी लोकांमध्ये जाऊन चांगले कार्य केले खासदार म्हणून त्या पुन्हा निवडून येतील अशी पाठराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रक्षा खडसे यांच्या आगामी लोकसभेच्या विजयाबाबत केले आहे.
इंडिया गाडीने जर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडली तर पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची उमेदवारी करेल असे वक्तव्य नुकतेच आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे मात्र याच रावेर लोकसभेच्या जागेवर गेल्या दोन टर्म पासून त्यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे या खासदार आहेत. सून विरुद्ध सासरा अशी लढत राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे काँग्रेसने जर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी करिता सोडली तर खडसे विरुद्ध खडसे अशी लढत रावेर लोकसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे नऊ वेळा पराभूत झालेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी जागा सोडावी अशी मागणी देखील आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर रणनीती आपले जात आहे. तिन्ही पक्ष एकत्र करून लोकसभा निवडणूक लढवतील अथवा राष्ट्रवादी यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढवता येतील का ? याबाबत देखील चाचणी केली जात आहे. केंद्रामध्ये सत्ता असल्याशिवाय देशात भाजप नाही हे समीकरण लक्षात आल्यावर प्रत्येक जातीवर भाजपकडून लोकसभेसाठी लक्ष केंद्रित केले जात आहे यासाठी राज्यभरात चौफेर भाजप नेत्यांचे दौरे सुरू आहे.
देशात सध्या लोकसभेचे वारे वाहत आहे सगळेच पक्ष उमेदवारांच्या चाचणीसाठी कामाला लागले आहेत आणि तिकडचे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता भाजपसह पक्षांनी वर्तवली आहे. देशात भाजपची लाट रोखण्यासाठी इंडिया आघाडी उभारण्यात आली आहे सर्वच विरोधी पक्ष या इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झाले आहेत काँग्रेस ची प्रमुख भूमिका म्हणून इंडिया आघाडीत असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सत्र आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. यामध्ये आगामी निवडणुकांची रणनीती महाराष्ट्रात काय असतात याबाबत विचार विमर्श करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.