जळगाव राजमुद्रा | जळगाव शहरातल्या नवी पेठ परिसरातील एमजी रोड मित्र मंडळ यांच्या वतीने मोठया जल्लोषात श्री गणेशाचे आगमन सोहळा आयोजित करण्यात आला, आकर्षक असे तरुणींचे तसेच तरुणांचे ढोल पथक गणेश आगमनाचे विशेष आकर्षण बनले नवनवीन देखावा आरास जळगावकरांना उपलब्ध करून देणारे मंडळ असे एमजी रोड मित्र मंडळाची ख्याती आहे.
शहरातल्या मुख्य मार्गावर असणाऱ्या एम.जी रोड मित्र मंडळ नेहमीच नवीन नवीन दिखावे सादर केले जातात यावर्षी सुद्धा थेट जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन जळगावकरांना गणेशोत्सवा दरम्यान घेता येणार आहे.
यासाठी विशेष नियोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आकर्षक अशा म्हाळसा तसेच भानुमातेच्या मुर्त्यांची पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. जेजुरीच्या खंडेराव मंदिरात असलेले सर्व पारंपारिक देखावे साकारण्यात आले आहे. यासोबतच प्रति खंडेराव मंदिर आशा रूढ प्रवेशद्वार गणेश भक्तांचे आकर्षण बनले आहे.
आतापर्यंत वैष्णोदेवी, अमरनाथ गुफा, बाबा बर्फानी, शेगाव श्री गजानन महाराज मंदिर, कारल्या येथील एकवीरा देवी, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, असे अनेक देखावे आरास जळगावकरांच्या पसंतीला आले आहे. एमजी रोड मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहे. जळगावकरांनी प्रति जेजुरी असलेल्या एमजी रोड मित्र मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले श्री खंडेराव मंदिरचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे मार्गदर्शक दिपक जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
एम.जी रोड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक जोशी, निखिल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष – नाना साठे, उपाध्यक्ष पराग सरोदे, सचिव निशांत मेहता , खजिनदार धर्मेंद्र चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख राहुल जगताप, प्रभू लोहार, मनोज चौधरी, जतीन मेहता, प्रशांत काळे, ईश्वर पाटील, राजू वाणी, प्रसाद कापडणे , निखिल चौधरी, मनोज तांबट, कमलेश देवरे यासह पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.