जळगांव | राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्ती व निर्मल्य संकलन केंद्र रामानंद नगर गिरणा टाकी जवळ उभारण्यात आले होते. सदर केंद्र मध्ये 1200 गणेश मूर्ती व 4 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, जीवन अत्तरदे, अमोलभाऊ कोल्हे, सुनील महाजन, राहुल मिस्त्री व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमात संकलन करण्यात आलेल्या गणपती बाप्पांचे विधीवद पुजा व आरती करून विसर्जन करण्यात आले. एवढे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे पर्यावरण संगोपनासाठी जळगावकरांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत मानला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्त्री यांनी केलेल्या संकलन केंद्र आयोजनाचे फलित या निमित्ताने दिसून आले आहे.