जळगाव राजमुद्रा | मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख तसेच विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री मंगेश चिवटे यांचे आगमन झाले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे जितेंद्र गवळी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन सर्व पदाधिकाऱ्यांसह कमलेश देवरे यांनी त्याचे स्वागत केले. यांच्यासह सकाळी सात वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस ने ते जळगाव दाखल झाले असून आज दिवसभर जळगाव जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेची झडाझडाती घेणार आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कारभाराची ते स्वतः माहिती घेणार असून सद्य परिस्थिती बाबत बैठकांचे सत्र हाती घेण्यात आले आहे.
यासोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवेचा देखील आढावा यादरम्यान मंगेश चिवटे घेणार आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सेवा देण्यात येते, यामध्ये अनेक गोरगरीब नागरिकांना आरोग्य यंत्रणेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत देण्यात येते. श्री मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतूनच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला होता.
आज राज्यभरात या वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुरू असलेला आरोग्याचा घोबळ कारभार याबाबत श्री मंगेश चिवटे यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.