जळगाव राजमुद्रा | महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना अचानकपणे हृदयात त्रास झाल्यानें त्यांना जळगाव शहरातील गजानन हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात येणार आहे. काही महत्त्वपूर्ण चाचणी जळगाव शहरात करण्यात आल्या आहे. असून यापुढील शासना कडून देखील उपचारार्थ मुंबईत करण्यात येणार आहे. बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे.
नेमक काय झालं ?
हृदयातल्या फुसफुसांमध्ये इन्स्पेक्शन तसेच ऍसिडिटी झाल्याने त्यांना अचानकपणे छातीत बरणीग सेंशन सुरू झाले त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आल्याचे लक्षात आले. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पुढील उपचारार्थ मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी खडसे यांची प्रकृती बिघडल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीने एअर ॲम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. एअर ॲम्बुलन्सने संध्याकाळपर्यंत आमदार एकनाथराव खडसे यांना मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील गजानन हॉस्पिटल येथे मोठ्या प्रमाणात खडसे समर्थक जमायला सुरुवात झाली आहे.
जिल्हाभरात माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर ही बातमी राज्यभरात वाऱ्यासारखे पसरली आहे. यामुळे राज्यभरातून खडसे समर्थकांना फोन सुरू झाले आहे. खडसेंच्या प्रकृती बाबत फोनवरून विचारणा केली जात आहे.