जळगाव (थेरोडा राजमुद्रा ) : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थेरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खाते उघडले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख शुभम पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाले आहे. एकूण मतदान ८५० मतदाना पैकी शुभम पाटील यांना ४५० झाले असून त्यांनी किरण गुलाबराव पाटील, प्रभाकर डिगंबर पाटील यांना पराभूत करत विजय संपादन केला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून प्रहार वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आहे दिव्यांग तसेच जण माणसासाठी प्रहारच काम आहे. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यामध्ये प्रहारच कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नवनिर्वांची लोकनियुक्त सरपंच पदी शुभम पाटील यांचा विजय झाल्यानंतर प्रथमच प्रहारने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले स्थान बळकट करायला सुरुवात केली आहे.
प्रस्थापित दोन पक्षाच्या उमेदवारांना धूळचाटत प्रहारने खाते उघडले आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांनी पॅनल देत आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सर्वाधिक जागा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याचे सूत्रांकडून समजते आहे.