जळगाव राजमुद्रा प्रतिनिधी :- फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव तालुक्यातील आवार या ७०० लोकवस्ती असलेल्या गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. गावक-यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
फटाके मुळे ध्वनी आणि वायू प्रदुषण होते. तसेच फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होतात व त्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या होऊ शकतात आणि पर्यावरणचे नुकसान होते. फटाक्यांमुळे पाणी, पक्षी घाबरतात.
या प्रसंगी जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी मदन लाठी, आवार गावाचे सरपंच गोकुळ सपकाळे, उपसरपंच संजय सपकाळे, माजी सरपंच सुनील सपकाळे, पोलीस पाटील पुरुषोत्तम चौधरी, शुभम सपकाळे, महिला बचत गटाचे अध्यक्ष सविता ताई , चंदा चौधरी, माय माता फाउंडेशन चे प्रभावती पाटील व ग्रामस्थ, महिला व शाळेतील मुलं उपस्थित होते.