बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा । तालुक्यातील मनुर गावात बेकायदेशीर रित्या तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सागर रामचंद्र बावस्कर. वय २८ राहणार ढोले नगर, मनुर. हा गावात बेकायदेशीर रित्या तलवार वागवून गंभीर गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पो.नि किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांचे पथक मनुर ला रवाना करण्यात आले. आरोपी सागर बावस्कर याला बोदवड ते मनुर रस्त्यावर असलेल्या भैरवनाथ बाबा मंदिराजवळून अटक करून त्याच्या ताब्यातून एक याल्वर हस्तगत करण्यात आली. हि कारवाई रवींद्र गायकवाड, राजेंद्र पवार, उमेश गिरी गोसावी यांनी केली.