24 तासात स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी
जळगाव राजमुद्रा | तालुक्यातील बिलवाडी येथे झालेल्या रखवालदाराच्या खुणाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात संशयितांना अटक करीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
तालुक्यांतील बिलवाडी येथील राजेंद्र नाथू पाटील यांच्या शेतातून ट्रॅक्टर चोरत असताना रखवालदाराने विरोध केला म्हणून त्याला ट्रॅक्टरच्या डाबर या लोखंडी सामानाने त्याचा खून केला असल्याचे संशयितांना कडून सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघा संशयित आरोपींना मध्य प्रदेश मधील सालीतांडा या गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील राजेंद्र नथू पाटील यांच्या शेतात रखवालदारी करणारा पांडुरंग पंडित पाटील रा.बिलवाडी याने ट्रॅक्टर चोरीच्या उद्देशाने आलेल्या पवन बहादिर बारेला वय – ३० रा बाघाड राजापूर, मध्यप्रदेश, वादलसिंग शोभाराम बारेला वय – 24 सालितांडा ता.राजापूर जि. बडवानी या दोघांनी मिळून पांडुरंग पाटील यांनी विरोध केल्याने त्यांचा खून करण्याची घटना बुधवारी १५ रोजी घडली होती.
असा रचला पोलीसांनी सापळा
दोघा संशयित आरोपींवर पोलिसांचा संशय बळवल्यानंतर त्यांची विचारपूस शेतमालक राजेंद्र पाटील यांच्याकडे केली असता ते दोघे चालकासह सालिकवाडी राजापूर येथे गेल्याचे सांगण्यात आले मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशातील ता. राजापूर, सालिकवाडी हे गाव गाठत दोघांना यशस्वीरीत्या ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपपोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन महाजन पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत, विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंबोरे, प्रीतम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप साबळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी या पथकाने विशेष कामगिरी बजावली आहे.