नाशिक राजमुद्रा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी अद्वय हिरे भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले. नाशिक जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा शिलेदार म्हणून पुढे आलेल्या अद्वय हिरे यांना अटक झाल्याने अनेक राजकीय तर्क लावली जात आहे.
शिवसेनेचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री भोपाळ मधून अटक करण्यात आली आहे आठ वर्षापूर्वी एका जुन्या प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहाराच्या कर्जावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादात त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक मध्ये राजकीय कोडी करण्यासाठी व ठाकरे गटाला टार्गेट करण्यासाठी अद्वय हिरे यांना नेमकी अटक करण्यात आली आहे का ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
अद्वय हिरे नेमके कोण ?
अद्वय हिरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर दादा भुसे शिंदे गटासोबत राहिले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना ठाकरे गटात घेऊन दादा भुसे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे यांचे कट्टर विरोधक ते आहेत. त्यांना शिवसेनेचे उपनेते करण्यात आले. त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे
रेणुका सूतगिरणी प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना भोपाळ मधून अटक करण्यात आली, या गिरणी साठी एकूण साडेसात कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतले होते हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा हिरे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. हिरे यांच्या अटकेवर त्यांच्या समर्थक आक्रमक झाले आहे. राजकीय कोंडी करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिरे यांना रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मंत्री दादा भुसे यांच्यासमोर अद्वय हिरे यांना उभे टाकले जाणार अशीच राजकीय चर्चा होती. मात्र त्यापूर्वीच त्यांना कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहे.
काय आहे प्रकरण ?
जिल्हा बँकेची रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर 32 कोटींची थकबाकी आहे. कर्ज घेताना बँकेची दिशाभूल करुन कर्ज घेतल्याचा आरोप अद्वय हिरे यांच्या वर करण्यात आला आहे. या प्रकरणात मालेगाव तालुक्यात असलेल्या रमझानपुरा पोलिसांत 29 जणांविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आठ वर्ष जुने आहेत. याबाबत कायदेशीर तिढा सुरू होता, न्यायालय मध्ये हिरे यांनी धाव घेतल्यानंतर त्यांचा मात्र जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.