माढा राजमुद्रा | पुढील अधिवेशनानंतर अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब एकत्र येतील असे विधान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यानुसार पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या अमळनेर – जळगाव येथे जाऊन आलो आहे ते पुन्हा निवडून येणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ असे राजकीय खळबळ माजवणारे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असलेले अनिल पाटील हे अमळनेर विधानसभेमधून प्रथमच निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद असल्याने ते अजित पवारांचे जवळचे मानले जातात. राज्यात भाजपासोबत सत्तेत जात असताना अजित पवार यांच्यासोबत अनिल पाटील यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे राज्याचे महत्त्वपूर्ण खाते मदत व पुनर्वसन विभाग देण्यात आला आहे.
मराठवाडा सारखाच खान्देशा मध्ये शरद पवार यांचा राजकीय प्रभाव आहे. राष्ट्रवादीचे एकूण सहा आमदार जळगाव जिल्ह्यातून होते. जिल्ह्यातील अनेक दिग्गज शरद पवार यांच्या भूमिकेत समर्थन देत असतात, शरद पवारांनी आजपर्यंत केलेल्या प्रतिष्ठेच्या जागा विजयी झाल्या आहेत. राज्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये शरद पवारांचा नाव येणार नाही अशी कुठलीही राजकीय घटना नाही.
राष्ट्रवादीसाठी जळगाव जिल्हा महत्त्वाचा राहिला आहे. मंत्री अनिल पाटील यांचा आगामी पराभवाचा दावा शरद पवारांची मुख्यतः रणनीती गाजवणारा ठरणार आहे. मुख्य प्रतोद ही महत्वपूर्ण जबाबदारी देऊन अनिल पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली. हेच प्रकरण शरद पवारांच्या जिव्हारी लागल आहे. मुसद्दी राजकारणी म्हणून शरद पवारांची राजकीय कारकीर्द आहे, यामुळे मंत्री अनिल पाटील यांची राजकीय वाट बिकट होणार का ? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकिय क्षेत्रात अनेक वर्षापासून आपलं राजकीय भवितव्य भाजपमध्ये आजमवत असताना सातत्याने येणारे अपयश यामुळे राजकीय स्थिरता मात्र त्यांना गाठता आली नाही. अशाच परिस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी जयश्री पाटील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या, एवढेच नाही तर शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनिल पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले.
प्रथमच आमदार आणि प्रथमच मंत्री असा दुर्मिळ योग अनिल पाटील यांच्या राजकीय कारकीर्द मध्ये जुळून आला आहे. त्यांच्या मंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यापूर्वी तशीच संधी गुलाबराव देवकर यांना मिळाली होती, मात्र तरी देखील अनिल पाटील यांचं मंत्रीपद अपवादच ठरले आहे.