जळगाव राजमुद्रा | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट शिवसेनेच्या वतीने संघटनात्मक आढावा घेण्यासाठी नवनियुक्त लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी हे जळगाव येथे येत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसेना – युवा सेनेच्या माध्यमातून संघटनात्मक वजाबाकी देखील केली जाणार आहे. ७ जानेवारी रोजी अजिंठा शासकिय विश्रामगृह येथे बैठीकीचे आयोजन करण्यात आले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून पदाधिकारी नेमणूक झाल्यानंतर करण्यात आलेले कार्य याचा सविस्तर आढावा लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी घेणार आहेत.
कोण आहेत सुनील चौधरी ?
नुकतेच नवनियुक्त झालेले शिंदे गट शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख अधिक परिचित आहे. सुनील चौधरी मुळ चे जळगाव जिल्ह्यातील आव्हाने येथील आहे. मात्र व्यावसायिक कारणास्तव त्यांनी मुंबई गाठली, शिवसेनेसोबत जोडल्यानंतर अंबरनाथ मध्ये त्यांनी नगरसेवक पदावर मजल मारली एवढेच नाही तर तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे तसेच जनतेमध्ये असलेला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू ठरली. कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ हे क्षेत्र देखील समाविष्ट आहे या भागात श्रीकांत शिंदे निर्विवाद खासदार म्हणून निवडून येतात या लोकसभा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील त्यांनी पेंलली आहे.जळगाव प्रती त्यांचे विशेष प्रेम म्हणूनच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्या समन्वयातून भाजपा सह घटक पक्षांची समन्वय ठेवण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारी ते पार पाडत आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. शिवसेनेच्या फुटीच्या पूर्वी भाजपमधून बंडखोरी केलेल्या भाजप नगरसेवकांची संपूर्णतः जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली होती या मोहिमेत महत्वपूर्ण शिलेदार म्हणून सुनील चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक यांना भरघोस विकास कामांसाठी निधी नगर विकास विभागातून मिळवून देणे तसेच व्यापारी संकुलातील गाळे धारकांचा महत्वपूर्ण भाडेतत्त्वाचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडणे जळगाव येथील पदाधिकाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून मार्ग काढून देणे अशी अनेक महत्वपूर्ण कार्य सुनील चौधरी यांच्या माध्यमातून झाली आहेत.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून जळगाव लोकसभेवर दावा करण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जळगाव लोकसभेमध्ये शिवसेनेचे मोठी राजकीय ताकद असून ही जागा महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी केली आहे या मागणीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील दुजोरा दिला असल्याने या संदर्भातील सविस्तर आढावा लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी घेणार आहेत.
यादरम्यान,अनेक राजकीय घडामोडी यादरम्यान घडणार आहेत सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात येणाऱ्या विकास निधी आणि झालेले विकास कामे याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे अवघ्या काही महिन्याच्या कालावधी नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा आहे त्याच पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी संघटनात्मक आढावा घेणार आहे.
संघटनात्मक आढावा घेण्यासाठी तसेच पक्षासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ आगामी लोकसभेच्या निमित्ताने आली आहे. याबाबत सविस्तर माहिती नवनियुक्त लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांच्याकडे मांडण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी संघटनेत केलेले कार्य याबाबत देखील अहवाल सादर करण्यात येणार आहे.
निलेश पाटील – जिल्हाप्रमुख (शिंदे गट)- शिवसेना
युवा सेनेच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य सुरू आहे. जळगाव शहरात अनेक जण यांचा प्रवेश युवा सेना काही दिवसात होणार आहे यासाठी संघटनात्मक कार्य करणाऱ्या युवकांना संधी दिली जाणार आहे. लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही सज्ज आहोत.
हर्षल मावळे – युवा सेना – महानगर प्रमुख