जळगाव राजमुद्रा : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी शहरातील हनुमान मंदिरांमध्ये सुंदरकाण्ड पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.७ जानेवारीला एल.आय.सी. कॉलनी रिंगरोड, ९ जानेवारी गणेशनगर, बाबा हरदासराम मंगल कार्यालयाजवळ, ११ जानेवारी रोजी हरिविठ्ठल नगर, १३ जानेवारी जागृत शिव हनुमान मंदिर, मधुबन अपार्टमेंट जवळ, १५ जानेवारी शिवकॉलनी तर १७ जानेवारी रामेश्वर कॉलनीत हा कार्यक्रम होणार आहे.
७ जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू होईल, तर १७ जानेवारीला तो समाप्त होईल. भाविकांमध्ये श्रीराम भक्ती रुजावी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चैतन्य निर्माण व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रत्येक ठिकाणी नियोजन केले जात आहे.
त्या दिवशी हा सोहळा लाईव्ह दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या वातावरण निर्मितीचा भाग म्हणून डॉ. अश्विन सोनवणे यांनी हनुमान मंदिरांमध्ये सुंदरकाण्ड पठण कार्यक्रम घेतला आहे.