मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आघाडी सारकारने पावसाळी अधिवेशनात ठराव करून आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावित विधेयकावर शेतकरी संघटनेंशी चर्चा करावी अशी मागणी अ.भा किसान संघर्ष समितीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या शिष्ठमंडळाने केली आहे. दरम्यान शिष्ठमंडळाने मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी समितीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा केली. आणि सांगितले की, केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्याच्या विरोधात आपले मत मांडून तसेच त्या कायद्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात ठराव संमत करावा अशी मागणी केली . यावर तातडीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन शरद पवार यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. या शिष्ठमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, एस व्ही जाधव, किशोर ढमाले, नामदेव गावडे, उमेश देशमुख, शकील अहमद, सीमा कुलकर्णी आदी उपस्थित