भुसावळ राजमुद्रा | तालुक्यातील मौजे मिरगव्हाण ता. भुसावळ येथील गट नं. ९६/१, ९६/२, ९६/३ या गटाच्या मंजूर अभिन्यासा तील ओपनस्पेस शैक्षणिक संस्थेसाठी वापरण्यात येवून स्वतःचे नाव लावल्या प्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी तत्कालीन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांनी अंतिम नोटीस संबंधित संस्थेस बजावली आहे. येथील स्व. दगडाबाई चंपालाल बियाणी शैक्षणिक विकास मंडळ भुसावळ यांनी मौजे मिरगव्हाण ता. भुसावळ येथील गट नं. ९६/१, ९६/२, ९६/३ या गटाच्या मंजूर अभिन्यासातील ओपनस्पेसला शासनाचे नाव न लावता स्वतःच्या शैक्षणिक संस्थेचे नाव लावून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी तत्कालीन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दि.११- १०-२०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि.४-१- २०२४ रोजी क्र. जमीन / ३/ २८/ई टपाल / २०२४/१७ या अन्वये नोटीस बजावून सात दिवसात लेखी खुलासा न चुकता सादर करावा अशी अंतिम कारणेदाखवा नोटीस काढली.
याबाबत आपला खुलासा विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपले काहीएक म्हणणे नाही असे गृहित धरून प्रस्तुत जमीन सरकार जमा करण्यात येईल, अशी अंतिम नोटीस भुसावळ तहसीलदारांमार्फत दि.१२-१- २०२४ रोजी बजावलेली आहे.