जळगाव राजमुद्रा | जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होत आहे. याबाबत चोरीचे वाहन घेताना आढळून आल्याने एकावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत जेरबंद केले आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून कमी दरामध्ये विक्री करण्याचा गोरख धंदा चोरट्यांनी सुरू केला आहे. कमी किंमत मध्ये म्हणून अनेक जण या दिवसाची खरेदी करीत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सतरा हाती घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, एरंडोल येथील राहणारा फारुख हुस्नोउद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटार सायकल विकत घेतली असून त्याचे घरी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानीक गून्हे शाखेच्या पथकास आढळून आल्याने वरिष्ठांच्या सूचनानुसार संशयताचा शोध घेऊनत पथकाने आरोपी फारुख हुस्नोउद्दीन शेख वय २९ रा. मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल यास ताब्यात घेवून माहिती घेतली असता त्याने सदरची मोटारसायकल सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे रा. पथराड ता.भडगाव याचे कडून मोटारसायकल चोरीची आहे असे माहीत असतांना सुध्दा विकत घेतल्याची कबूली दिल्याने गुन्हा उघडकीस आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, जळगाव यांनी निरीकक्ष.निलेश राजपुत, पो.उप. निरी. श्री. गणेश वाघमारे, पो.ह सुनिल दामोदरे, पोह महेश महाजन, पो.ह. नंदलाल पाटील, पो.ह. संदिप सावळे, पो.ना. भगवान पाटील, पो.ना.राहुल बैसाणे, पो.ना. अशोक पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या माध्यमातुन कारवाई करण्यात आली आहे. सदरची मोटरसायकल पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे.