चाळीसगांव राजमुद्रा | क्रिकेट स्पर्धेच्या वादातून मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राण घातला झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव येथे घडली आहे. शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी 14 जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. शुभम अर्जुन आगोणे (वय 28 ) राहणार चाळीसगाव असे मयत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव येथे विविध ठिकाणी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. यामुळे सर्वच स्तरातील युवक वर्ग यामध्ये सहभागी होत आहे. शुभम आगोणे याचा सामन्या दरम्यान वाद झाला. सामन्याचा विषय किरकोळ वादावर न थांबता मोठ्या प्रमाणावर पडून आला यामध्ये शुभम वर तलवारीने सपासप वार केल्याने तो गंभिर जखमी झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले आहे. मात्र नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला आहे.
घटनेची माहिती समजताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.