जळगाव राजमुद्रा | मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले अखेर पोलिसात हजर झाले आहे. सोमवारी 15 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण गेले आहे. एकूण दीड वर्षापासून बकाले हे फरार होते न्यायालयान जामीन वेळोवेळी नामंजूर झाल्याने अखेर बकाले यांनी स्वतःला सरेंडर केले आहे.
रेकॉर्डिंग व्हायरल झाली..
पोलीस कर्मचारी अशोक महाजन यांच्याशी संवाद करीत असताना मराठा समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यामुळे मराठा समाजाकडून बकाले यांच्यावर विनोद देशमुख यांच्या फिर्यादीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हे अंतर्गत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून किरणकुमार बकाले हे प्रयत्नशील होते. मात्र न्यायालयाकडून सतत फेटाळण्यात आलेल्या जामीनामुळे ते एकूण दीड वर्ष फरार राहिले. एका जबाबदार अधिकाऱ्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य म्हणून मराठा समाजाने कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.
मराठा समाज आक्रमक
तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेली काही दिवस मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण देखील जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. यादरम्यान जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांवर देखील आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडण्यात आल्या होत्या, बकाले यांच्या मागे राजकीय आशीर्वाद असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. मात्र अखेर सर्वच पर्याय संपल्याने बकाले यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत शरण गेले आहे.