जळगाव राजमुद्रा | महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मराठी भाषिकांचे एकमेव पुरस्कर्ते हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक २० वी ‘जळगांव जिल्हा श्री’ २०२४ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन जयंतीच्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारी २०२४ रोजी जळगांव येथील श्री साईबजरंग जिमचे पटांगण, नवीन पिंप्राळा उड्डाण पुल जवळ, राधाकृष्ण नगर छत्रपती शिवाजी नगर जळगांव या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासुन प्रकाश झोतात भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.
जळगांव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक २० वी ‘जळगांव जिल्हा श्री’ २०२४ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्पर्धेचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे –
वजन गट- भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या नियमाप्रमाणे ० ते ५५ कि.ग्रॅम, ५६ ते ६०कि.ग्रॅम, ६१ ते ६५ कि.ग्रॅ., ६६ ते ७० कि. ग्रॅम वरील असे एकुण ४ वजनी गट राहतील.
विजयी स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात येईल १ ते ५ क्रमांकास रोख रक्कम तसेच स्मृतिचिन्ह, व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल. एकमेव विजयी स्पर्धकास ‘बाळासाहेब ठाकरे चषक २०२४’ रोख रक्कम रू.११०००/- देण्यात येईल. तसेच बेस्ट पोझर रू.५००१/-, मोस्ट इम्प्रुव्हड रू. ३००१/- तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल.
स्पर्धेच्या निमित्ताने भव्य रंगमंच ३०x४५ फुटाचे राष्ट्रीय स्तराचे स्पर्धेकरीता वापरण्यात येणारे भव्य रंगमंच डिजीटल स्क्रीन, विशिष्ट प्रकारचे प्रकाश संयोजन, उच्च प्रतिचे साऊंड सिस्टीम्स्, स्पर्धकांची रंगमंचासमोर प्रेक्षक व खेळाडूंची वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे नियोजन शिस्तबंध्द व्हावे याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
स्पर्धा आयोजन समिती मध्ये मा. जयश्रीताई महाजन सोो. मा. महापौर ज.श.म.न.पा., मा.श्री. कुलभुषण पाटील सोो. उपमहापौर ज.श.म.न.पा. जळगांव, मा.श्री. सुनिलभाऊ महाजन, मा.श्री. कैलास घुले, मा.श्री. शरदभाऊ तायडे, मा.श्री. बाळासाहेब कंखरे, मा.श्री. विजय बांदल, मा. श्रीकांतशेठ खटोड, मा. श्री. मुकेशशेठ हासवानी, मा.श्री. राहुल सारवत, विलास यशवंते, राजेश लखोटे, आदि मान्यवर उपस्थीत असणार आहे.
बक्षिस वितरण समिती मध्ये मा.पालकमंत्री ना.श्री. गुलाबरावजी पाटील, मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन, मा. श्री. संजयजी सावंत (मुंबई), मा.आ.श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. राजकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन ठाणे, मा. ज्ञानेश्वर पाटील (आर.पी.एफ. इन्पेक्टर, जळगांव), रविंद्र वंजारी, शशांक सोनी, ईश्वर सोनार, योगेश जावळे, फिरोज खान गुलबाज खान, जावेद शाहा हकीम शाहा, रहीम शेख सारवत, चंदु कांबळे, मयुर सोनी, शैलेशभाऊ पाटील, जावेद बिल्डर (भडगांव), जावेद शेख (रावेर), नासीर शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.