भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ शहरातील महेश मर्चंट को-ऑफ क्रेडीट सोसायटीच्या लेखापरीक्षणात अनियमीतता असल्याच्या तक्ररीनंतर जिल्हा निबंधक संतोष बिडवाई यांनी संस्थेचे झालेले लेखा परीक्षण सादर करण्याचे आदेश नुकतेच संस्था चेअरमन व व्यवस्यापकांना दिले आहे.
सोसायटीचे अनेक वर्षांपासून लेखा परीक्षण झालेले नाही. याबाबत येथिल माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती. याबाबतच्या चौकशीत संस्थेने २२ जून २०२१ रोजीच्या पत्रानुसार सोसायटीचे चेअरमन यांनी लेखा परीक्षण झाले असल्याचे जिल्हा निबंधकांना पत्राद्वारे कळविले होते. मात्र लेखा परीक्षक बी.टी. पाटील यांनी केलेले लेखा परीक्षण अहवाल येणे बाकी आहे. व त्यामुळे तो अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा निबंधक संतोष बिडवाई यांनी सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापकांना दिले आहे.
जिल्हा निबंधकांनी प्रत्यक्ष हा अहवाल सादर करण्याबाबत सोसायटीला कळविले असल्यामुळे सोसायटीच्या ठेविदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र संस्था संचालक व कर्जदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतचा अहवात जिल्हा निबंधकांना कधी सादर होणार? तसेच पुढे काय कारवाई होते? याबात उत्सुकता निर्माण झाली आहे.