माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे करणार रामभक्तांना प्रसाद वाटप
जळगांव राजमुद्रा | येत्या चार दिवसावर अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने त्यापूर्वी देशभर श्रीराममय वातावरण तयार झाले असून या कार्यक्रमाचा आनंद देशभर होत आहे. तर देशातील प्रत्येक मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे देशभर यंदा २२ जानेवारी या दिवशी दिवाळी साजरी होणार असून या दिवशी अनेक ठिकाणी भव्य मिरवणुकासह ढोल ताशाच्या गजरात श्रीरामांचा जयघोष देखील होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जळगाव शहर देखील मोठ्या प्रमाणात सजविण्यात आले असून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जळगावकर नागरिकांना प्रसादाचा सुद्धा लाभ मिळणार आहे. शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील रामभक्तापर्यत हा प्रसाद पोहचविण्यात येणार असल्याने हा प्रसाद बनविण्याचे काम देखील सुरु झाले आहे. यावेळी ३५ ते ५० हजार घरामध्ये बुंदीचा प्रसाद रामभक्तानपर्यत पोहचविण्यात येणार आहे.