जळगाव राजमुद्रा : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याच्या उड्डाणपुलाजवळ कपाशी व्यापाऱ्याची गाडी अडवून जबरदस्तीने तब्बल दीड कोटीची रक्कम अज्ञात तीन चोरट्यांनी लुटल्याचे खळबळ जनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच एलसीबी पथक तसेच धरणगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कपाशी व्यापारी आपल्या मालाचे पैसे घेऊन जात असताना दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे पेमेंट जळगाव येथून प्रिंप्री या गावाकडे घेऊन जात असताना निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली गाडी येताच कारमधून आलेल्या तिघांनी पैसे असलेल्या गाडी अडवून अवघ्या काही मिनिटात पैसे लुटून फरार झाले आहे घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.