जळगांव राजमुद्रा | सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती-जळगाव तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक,पिप्राळा येथे ह. भ. प. गोपाल महाराज चिमठाणेकर यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी गोपाल महाराज यांनी आपल्या किर्तना मधून छत्रपती शिवाजी महाराजाचा जाज्वल्य इतिहास मांडला तसेच महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्धी होती या बद्दल आपल्या किर्तना मधून वास्तव्य मांडले आहे. सुराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला निश्चय यासोबतच आई जिजाऊंचे केलेली स्वप्नपूर्ती अशा विविध विषयांवर कीर्तनात उलगडा करण्यात आला.
आजच्या आधुनिक युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्नपूर्ती चे विचार ध्येयप्राप्तीकडे नेणारे आहे. यासाठी तरुणांनी छत्रपतींच्या विचारांनी पावले टाकण्याची गरज आहे. देशासह जगभरात छत्रपतींच्या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. साडेतीनशे वर्षानंतर देखील छत्रपतींची आठवण प्रत्येकाच्या हृदयात आहे अशीच कार्य आपण देखील करावी समाज मनात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नेहमी निर्णयाच्या दिशेने वाटचाल करावी, युवा पिढीने छत्रपतींना आदर्श मानून हिंदवी स्वराज्य सारखेच स्वतःचे साम्राज्य निर्माण करावे असे विचार ह. भ. प. गोपाल महाराज चिमठाणेकर यांनी आपल्या कीर्तनात मांडले आहे.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समितीचे अध्यक्ष माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महाराजांची माल्यार्पण शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व किर्तनाचे श्रवण केले
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी उप महापौर कुलभूषण पाटील जयंती मिरवणूक मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जळगावकर नागरिकांना केलेले आहे. सकाळी आठ वाजता सार्वजनिक शिवजयंती मिरवणुकीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून सुरुवात होणार असून भव्य – दिव्य अशा स्वरूपात मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.