जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे मा. खा. सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा व जाळी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी महानगर सरचिटणीस योगेश कदम, नगरसेवक संदेश भोईटे, नगरसेवक अंकुश कोळी, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे, समाजसेविका जनाबाई सणस, दिलीप नाझरकर, संजय कदम, रितेश जाधव, नरेंद्र शिंदे, हरीश कदम, आकाश सणस, दीपेश तरडे, मनीषा कळंबे, जनाबाई ठाकूर, दीपाली जाधव, दर्शना कदम, मनीषा शिंदे, सय्यद आत्तर, छोटू शिंपी, दिलीप पाटील, समाधान बोरकर, किरण सातव, कुणाल तरडे, भूषण लोहार आदी उपस्थित होते.